“पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे मार्गदर्शन

(जिल्हा परिषद, ठाणे) — महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित “पोषण भी पढ़ाई भी” या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांनी जिजामाता वर्किंग विमेन्स हॉस्टेल (WWH), कोपरी, ठाणे येथील इमारतीत दि. १० नोव्हेंबर, २०२५ रोजी भेट देऊन अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी गर्भावस्थेपासून बालक ६ वर्षांचे होईपर्यंतच्या वाढीमध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका, जबाबदारी आणि समाजातील त्यांचे योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रशिक्षण वर्गात उपस्थित अंगणवाडी सेविकांशी थेट संवाद साधला आणि सांगितले की, “अंगणवाडी सेविका ही प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील पहिली मार्गदर्शक असते. गर्भावस्थेपासून बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीत तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सेविकांनी आपल्या कार्यातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोषण आणि शिक्षणाचा संदेश पोहोचवावा.”

तसेच त्यांनी संतुलित आहार, स्वच्छता, लसीकरण, प्री-स्कूल एज्युकेशन आणि पालकांचा सहभाग या विषयांवर माहिती देत, प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग संजय बागुल, बालविकास प्रकल्प अधिकारी, नवी मुंबई, बालविकास प्रकल्प अधिकारी, मीरा-भाईंदर, सर्व मुख्य सेविका आणि प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी सांगितले की, “पोषण भी पढ़ाई भी हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो बालविकासासाठीचा व्यापक उपक्रम आहे. सेविकांनी शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कार्यात राबवल्यास बालकांचे भविष्य घडविण्यात मोठा हातभार लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *